वाखरी: रणजितदादांच्या माध्यमातून विकासकामांचा धडाका – कोट्यवधींच्या निधीतून रस्ते सुधारणा


फलटण तालुक्यातील वाखरी गावात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

स्थैर्य, वाखरी, दि. 21मे : फलटण तालुक्यातील वाखरी येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये रस्ते, तलाव आणि पुलाच्या कामांचा समावेश असून, गावाच्या विकासाला मोठी गती मिळाली असल्याचे मत पंचायत समिती सद्स्या सौ. शुभांगी तुकाराम शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

विकासकामांचा मोठा निधी

वाखरी गावात गेल्या काही वर्षांत विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. नुकतेच गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये वाखरी तलावासाठी ५० लाख रुपये, वाखरी ते वाठार निंबाळकर रस्त्यासाठी ४ कोटी १० लाख रुपये, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटू नये यासाठी ओढ्यावरील पुलासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे मत तुकाराम शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या ३० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती केवळ ५ वर्षांत मार्गी लागल्याची भावना ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या विकासकामांसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही गावात भरघोस निधी आणण्यात आला आहे.

ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

याप्रसंगी भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, पंचायत समिती सदस्या शुभांगी तुकाराम शिंदे, वाखरी ग्रामपंचायत सरपंच गणपत तुकाराम मोहिते, सोसायटी चेअरमन तानाजी ढेकळे, व्हाईस चेअरमन अंकुश मोहिते, बुवासाहेब ज्योतीराम गरड, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग सर्जेराव गरड, हणमंत मोहिते, सचिन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य योगिनी अमित गायकवाड, संभाजी बापू मोहिते, दत्तात्रय मोहिते गुरुजी, माजी सरपंच सारिका जाधव, माजी उपसरपंच उत्तम जाधव, शिवाजी जाधव, अंकुश राजेंद्र जाधव, संतोष ढेकळे, विनायक गरड, मल्हारी जाधव, किसन मोहिते, नवनाथ मोहिते, शंकर मोहिते, विकास शिंदे, सुहास शिंदे, तुषार शिंदे, सचिन जोतीराम मोहिते, सचिन शिंदे, पांडुरंग ढेकळे, मल्हारी जाधव, दिनेश ढेकळे, दत्तात्रय मोहिते, गुलाब जाधव, दिलीप जाधव, किसन निंबाळकर, बाळू जाधव, मारुती मोहिते गुरुजी, राजेंद्र मारुती जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!