टीएसी सिक्युरिटीकडून सायबर रिस्क क्वॉन्टिफिकेशन टूलची भर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२३ । मुंबई । टीएसी सिक्युरिटी या सॅन-फ्रान्सिस्कोमधील सुरक्षा व्यवस्थापनातील जागतिक अग्रणी कंपनीने आपल्या ईएसओएफ प्लॅटफॉर्ममध्ये सायबर रिस्क क्वॉन्टिफिकेशन (सीआरक्यू) टूलची भर करण्याची घोषणा केली आहे, जे सायबर रिस्क व असुरक्षिततांना नॉन-टेक्निकल कार्यकारींना सुलभपणे हस्तांतरित करता येतील अशा डॉलर मूल्यांमध्ये बदलते.

ईएसओएफ सीआरक्यू वैशिष्ट्य सायबर जोखमीचे मापन करण्यासाठी आणि संपूर्ण संस्थेला जोखमीचे आर्थिक दृश्य प्रदान करण्यासाठी मानत उद्योग गणनाचा वापर करते. ही गणना उल्लंघनाच्या संभाव्यतेवर आणि त्या उल्लंघनाच्या अंदाजे परिणामावर आधारित आहे. तसेच ही गणना वरिष्ठ व्यवस्थापनासोबत चर्चांकरिता उच्च-स्तरीय आर्थिक मेट्रिक तयार करण्यासाठी संस्थेच्या मालमत्तांमध्ये लागू केली जाते.

टीएसी सिक्युरिटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिश्नीत अरोरा म्हणाले, “बहुतांश सुरक्षा प्रमुखांचा सायबर जोखीमेवर अनेक टेक्निकल डेटा आहेत. पण यापैकी कितीजण ‘उल्लंघन झाल्यास आपल्याला त्याचा किती खर्च येऊ शकतो?’ या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नसाल तर तसे तुम्ही एकटेच नाही. रिस्क-बेस्ड वल्नेरेबिलिटी मॅनेजमेंटच्या क्रांतीमधील हे पुढील पाऊल आहे. ईएसओएफ व्हीएमपी सारख्या सोल्यूशन्सनी ऑटोमेटेड प्रायोरिटायझेशन टूल्स व सायबर रिस्क स्कोअरिंग सादर करत मदत केली आहे. पण सीआरक्यू शिवाय टेक्निकल रिस्क सुविधा व्यवसायांना त्यांच्या संदर्भात जलदपणे संभाव्य परिणामांना ओळखण्यास मदत करत नाही.’’

ईएसओएफ सीआरक्यूसह टीएसी सिक्युरिटीचा व्यवसायाला समजेल अशा स्‍वरूपात सायबर जोखीम सादर करत कार्यकारींना निर्णय घेण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे. टीएसी सिक्युरिटीला माहित आहे की, अनेक साधने व अनेक डेटामुळे व्यवसायासंदर्भातील सायबर जोखीमांना व्यक्त करणे अवघड जाते, परिणामत: सायबर विमा निर्णयांमध्ये अडथळा येतो. सादर करण्यात येणारे टेक्निकल जोखीम स्कोअर नॉन-टेक्निकल कार्यकारींसाठी उत्तम कामगिरी करत नाही. ईएसओएफ सीआरक्यू कोणत्याही कार्यकारींना समजू शकेल असे डॉलर मूल्य जोखीम मेट्रिक प्रदान करत या त्रासदायक मुद्दयांचे निराकरण करते.


Back to top button
Don`t copy text!