फलटण: मलठण पालखी महामार्गाची पाहणी – पालखीपूर्वी काम पूर्ण करण्याचा इशारा


मलठण पालखी महामार्गाची नगरसेवक रोहित नागटिळे व राहुल निंबाळकर यांनी पाहणी केली. उखडलेले रस्त्याचे काम पालखीपूर्वी पूर्ण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. २१ मे : फलटण शहरातील मलठण येथून जाणाऱ्या पालखी महामार्गाची नगरसेवक रोहित नागटिळे आणि पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी उखडलेला पालखी मार्ग तातडीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

या पाहणी दरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय देशपांडे, कंत्राटदाराचे प्रतिनिधी पाटील यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. अधिकाऱ्यांसमवेत महामार्गाच्या सद्यस्थितीचा आणि सुरू असलेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार ही पाहणी करण्यात आली. मलठण भागातून जाणाऱ्या पालखी महामार्गाचा जेवढा रस्ता उखडलेला आहे, तेवढे काम पालखी येण्यापूर्वी तातडीने पूर्ण करून घ्यावे. तसेच, नव्याने कोणताही मार्ग उखडू नये, असे निर्देश नागटिळे यांनी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!