आमिर खानचे OTT वर पदार्पण : आमिरची प्रॉडक्शन कंपनी सायन्स फिक्शन वेब सीरिज तयार करणार


 

स्थैर्य, दि.१७: हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक
मोठे कलाकार डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसत आहेत. शाहरुखचे होम
प्रॉडक्शन नेटफ्लिक्ससाठी वेब शो बनवत आहे. आता आमिर खानदेखील या
माध्यमाकडे वळला आहे. त्याच्या निर्मिती कंपनीशी संबंधित सूत्रांनी
सांगितले की, आमिर खान आपल्या बॅनर अंतर्गत सायन्स फिक्शन प्लान करत आहे.
या संदर्भात बरीच गुप्तता बाळगण्यात येत आहे. तथापि, त्याच्या कंपनीत काम
करणा-यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या स्क्रिप्टिंगवर काम सुरु
आहे. फेब्रुवारीपासून वेब सीरिजवर काम सुरु होणार आहे.

वरुण-रणबीरला विचारणा

या
प्रोजेक्टच्या दिग्दर्शनाची धुरा कपिल शर्मावर सोपवण्यात आली आहे. कपिल
शर्मा हे अॅड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. आमिर खान प्रॉडक्शनशी संबंधित
लोकांनी सांगितले की, ‘आमिरचा हा नवा प्रोजेक्ट मुळात थ्रिलर आहे, परंतु
या कथेत विज्ञान-संबंधित प्रयोग आणि तंत्रे वापरली जातील. आमिर
इंडस्ट्रीतल्या एका मोठ्या स्टारसमवेत याची योजना आखत आहे. वरुण धवन आणि
रणबीर कपूर यांची नावे चर्चेत आहेत. आयुष्मान आणि राजकुमार राव यांनादेखील
संपर्क साधण्याची शक्यता आहे.’

आमिरची
निर्मिती संस्था ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉट स्टारसाठी तयार करु शकते.
याचे प्रमुख उदय शंकर यांच्याशी आमिरचे चांगले संबंध आहेत. उदय शंकर
यांच्या सांगण्यावरुन आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम स्टार
प्लससाठी केला होता. पहिल्या सीझनच्या लाँच वेळी आमिरने बिहारलाही भेट दिली
होती.

स्वतः भूमिका करणार नाही

आमिरने
स्वत: या प्रोजेक्टमध्ये काम न करण्यामागची ठोस कारणे आहेत. त्याच्या
निकटवर्तियांनी सांगितल्यानुसार, तो सध्या ‘लालसिंग चड्ढा’च्या पोस्ट
प्रॉडक्शनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या वॉर सीक्वेन्सचे शूटिंग
तुर्कीमध्ये होणार आहे. लडाख आणि काश्मीरमध्ये शूटिंगला उशीर होत आहे. अशा
परिस्थितीत आमिर पर्यायी लोकेशनच्या शोधात आहे. त्यामुळे तो या कामात सध्या
बिझी आहे. ‘लालसिंग चड्ढा’ नंतर लगेचच तो ‘मोगुल’वर काम सुरु करणार आहे.
टी-सीरिज आणि सुभाष कपूर यांच्या या प्रोजेक्टला अनेक कारणांमुळे बराच उशीर
झाला आहे. निर्मात्यांना यापुढे उशीर करायचा नाही.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!