डंपर ची दुचाकीला धडक महिला ठार


स्थैर्य, वाई, दि.२३: येथील भद्रेश्वर पुलावर दुचाकीला डंपरने पाठीमागून धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली.
आज दुपारी अलका सुरेश सोनवणे (वय ५० राहणार ओझर्डे ,ता वाई )या आपल्या पतीसमवेत घर सामान घेण्यासाठी वाईला येत होत्या. यावेळी सुरुर वाई रस्त्यावर भद्रेश्वर पुलावरन शहराकडे येत असताना त्यांच्या स्कुटीला क्रमांक (एमएच ०२ बीयू ४४२४) या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.डंपरची (एम एच ११सीएच ३६९३) धडक जोरात बसल्याने त्या डंपरच्या पुढील चाकाखाली येऊन फरफटत गेल्या.त्यात अलका सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला अशी तक्रार पती सुरेश आनंदराव सोनावणे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.तर प्रत्यक्ष दर्शी काही साक्षीदारांनी सांगितले की पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.त्यामुळे तयार झालेल्या गतिरोधकावरून जात असताना अलका दुचाकीवरून खाली पडल्या त्या धक्क्याने त्यांच्या पतीची दुचाकी बाजूला पडली .पाठीमागून वेगात आलेल्या डंपर खाली आल्याने त्या पुढच्या चाकाखाली येऊन फरपटत जाऊन चिरडून ठार झाल्या.आधीक तपास वाई पोलीस करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!