मनोज जरांगेंच्या आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढणार : मुख्यमंत्री

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर कायद्याच्या चौकटीत मार्ग काढण्यात येईल. ज्या मागण्या कायदेशीर संविधानाच्या चौकटीत बसणार्‍या आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, जे काही आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आहेत. ते चर्चा करत आहेत. यापूर्वीही आपण मार्ग काढला आहे. यापुढेही काढणार आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील पहिल्या दिवसापासून अत्यंत संवेदनशीलपणे प्रयत्न करत आहेत.

मनोज जरांगे यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यावर आमची चर्चेची दारे खुली आहेत. ज्या मागण्या कायदेशीर, संविधानाच्या चौकटीत बसणार्‍या असतील आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणार्‍या नसतील अशा सगळ्या मागण्यांवर आमची चर्चा करण्याची आणि मार्ग काढण्याची तयारी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!