मुंजवडीतील शेतकऱ्याचे अपहरण करून पोकलेन चोरीला; जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2023 | फलटण | तालुक्यातील मुंजवडी येथील शेतकरी असलेले संतोष पोपट साळुंखे यांच्या शेतामध्ये घुसून त्यांचे इनोव्हा कारमध्ये घालून त्यांचे असलेला पोकलेन चोरला असून त्यांचे अपहरण करून त्यांना माळशिरस तालुक्यातील निमगाव पाटी येथे नेवून त्यांना मारहाण करत त्यांच्या अंगावरून गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद संतोष साळुंखे यांनी दिली आहे; त्यानुसार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी कि; फिर्यादी संतोष साळुंखे हे त्यांचे पोकलेन मशीनचे शेजारी असताना तेथे इनोव्हा व स्विफ्ट कार यामधून यातील सर्व आरोपी संगणमत करून येऊन त्यांनी फिर्यादीचे जबरदस्ती अपहरण करून फिर्यादीचे पोकलेन मशीन ट्रेलर वर चढवून फिर्यादी यांना जबरदस्तीने त्यांनी आणलेल्या इनोव्हा कारमध्ये घालून निमगाव पाटी तालुका माळशिरस येथे नेवून फिर्यादी यांना मारहाण करून फिर्यदीचे अंगावर कार घालून फिर्यादी यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच पोकलेन चोरी करून घेऊन गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!