“केस मागे घे; अन्यथा जीवे मारिन” असे म्हणत फलटणमध्ये मारहाण; शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2023 | फलटण | येथील सोमवार पेठ मध्ये सौ. वैशाली जाधव यांच्यावर दबाव टाकत “केस मागे घे; अन्यथा जीवे मारिन” असे म्हणत त्यांना व त्यांच्या पती मारहाण केली असल्याबाबतचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी सौ. वैशाली जाधव यांनी दाखल केला आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी कि; दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास फिर्यादी सौ. वैशाली जाधव या किराणा दुकानांमध्ये गेल्या असता जाताना कविता नरेश पवार व अन्य साथीदारांनी तू दाखल केलेली “केस माघारी घे; नाहीतर तुला जीवे मारिन” असे म्हणत सर्वानी मिळून फिर्यादी सौ. वैशाली जाधव व त्यांचे पती यांना मारहाण केली आहे.


Back to top button
Don`t copy text!