
स्थैर्य, सातारा, दि.५: बांधावर तणनाशक मारल्याच्या कारणावरून चिडून जावून दोघाजणांना लाकडी दांडक्याने व विळ्याने मारून जखमी केल्याप्रकरणी तिघांजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सचिन शंकर ढोकळे, सागर शंकर ढोकळे आणि अमोल शंकर ढोकळे सर्व रा. लिंब फाटा, ता. सातारा अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास विष्णू ग्यानबा ढोकळे रा. लिंब फाटा हे गावातील रामलिला मंगल कार्यालयासमोरील उपळ नावाच्या शिवारात आपल्या घरासमोर उभे होते. त्यावेळी सचिन ढोकळे, सागर ढोकळे आणि अमोल ढोकळे तेथे आले. या तिघांनी विष्णू ढोकळे आणि त्यांचे बंधू कृष्णात यांना बांधावर तणनाशक मारल्याच्या कारणावरून म्हशीच्या गळ्यातील लोढणे आणि लाकडी दांडक्याने व विळ्याने जबर मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. याप्रकरणी विष्णू ढोकळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रजपूत करत आहेत.