जनावरांची वाहतूक करणार्‍या गाडीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी गाडीमालकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास जनावरांची वाहतूक करताना टेम्पो (क्र. एमएच-११-एएल-५८०२) च्या परवान्यामध्ये खाडाखोड करून बनावट परवाना तयार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गाडीमालकासह दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताजुद्दीन रजाक कुरेशी (राहणार मंगळवार पेठ, फलटण, जिल्हा सातारा) व संतोष बबन होळकर (राहणार सोमंथळी, तालुका फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत ९ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ११.५० वाजण्याच्या सुमारास टाटा कंपनीचा एमजीपी मॉडेलचा टेम्पोचा मालक ताजुद्दीन रजाक कुरेशी याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पोलीस व आरटीओ विभाग यांचे फसवणूक करण्याच्या उद्देशाने स्वतः अगर कोणाच्यातरी मदतीने वर नमूद वादग्रस्त जनावर वाहतुकीच्या परवान्याच्या तारखेमध्ये फेरफार करून बनावट परवाना तयार करून जनावर वाहतुकीसाठी खरा परवाना म्हणून वापर करून शासनाची फसवणूक केली आहे, अशी तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.

या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ई. पाटील करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!