पळवून नेऊन युवतीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
शिंदेनगर (ता. फलटण) येथील एका युवतीस पळवून नेऊन जबरदस्तीने तिच्याबरोबर लग्न करून तिच्यावर पेडगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथे बलात्कार केल्याप्रकरणी दोघा आरोपींवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिंदेनगर (ता. फलटण) येथे राहणार्‍या पीडित युवतीने फिर्याद दिली असून सूरज जाधव (रा. पेडगाव, ता. खटाव, जि. सातारा) व मल्हारी जयसिंग चव्हाण (रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, या प्रकरणातील आरोपी व फिर्यादी यांची इंस्टाग्रामवरून ओळख झाली. ओळखीतून आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने लग्नाची मागणी घातली. तिने तिच्या घरच्यांना विचारा, असे सांगितले असताना सुद्धा दोघा आरोपींनी संगनमताने तिला पळवून घेऊन गेले व तिच्याबरोबर रानात लग्न केले. तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची फिर्याद पीडितेने पोलिसात दिली आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरगडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!