वर्णे येथे  शिवजयंती मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल


स्थैर्य, वर्णे, दि. २१: कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त मिरवणुका न काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी काढूनही मिरवणूक काढल्याप्रकरणी वर्णे (ता.सातारा) येथील १९ जणांसह अज्ञात  १५ ते २०  जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या घटनेची पोलीस जवान अमित अनंत पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेली ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे.

कोरोना साथरोगाचा वाढत असलेल्या प्रादुर्भावामुळे शासनाने शिवजयंती मिरवणुका न काढण्याचे निर्देश दिले होते.सातारा जिल्हाधिकाऱ्यानी या बाबतचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात देऊन मिरवणुकांवर निर्बंध घातले होते.

तरीही शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वर्णे येथे तुषार विष्णू काळंगे,विशाल गायकवाड, सागर साळुंखे,रवींद्र काळंगे,प्रदीप किसन पवार,राहुल दादासो सुतार,गणेश सुतार,तानाजी संपकाळ, प्रशांत भोसले,सोमनाथ संपकाळ,जोतिराम कृष्णत काळंगे,सूरज अवघडे, शुभम विनायक पारीख,अक्षय आप्पासो काळंगे,राहुल बर्गे,रणजित पवार ,निखिल पवार,बंडा निवृत्ती उगळे, सुदर्शन शिवाजी सपकाळ यांच्यासह इतर सुमारे १५ ते २० अज्ञात लोकांनी ट्रॅक्टर ट्रॉली सजवून त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा ठेऊन मिरवणूक काढून गर्दी केली.

बोरगाव पोलिसांनी त्यांच्या विरोधात भा.दं. वि.क.१८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (बी),भारतीय साथरोग अधिनियम १८९७ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केली आहे.पुढील तपास हवालदार विजय देसाई करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!