दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
पठार वस्ती, ताथवडा (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत राहत्या घराच्या आडोशाला उघड्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ६३० रूपये किमतीच्या देशी दारूच्या ९ सीलबंद काचेच्या बाटल्या जप्त करून दारूची विक्री करणार्या अश्विनी बबन जाधव (वय ३२, रा. पठार वस्ती, ताथवडा, ता. फलटण) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस नाईक बनकर करत आहेत.