खामगाव येथे बेकायदा दारूधंद्यावर छापा; १५ देशी दारूच्या बाटल्या जप्त

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
खामगाव (साखरवाडी, ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ३१ ऑगस्ट रोजी घराच्या आडोशाला बेकायदा दारूधंद्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १ हजार ५० रूपयांची देशी दारू असलेल्या पंधरा सीलबंद काचेच्या बाटल्या जप्त केल्या व हा धंदा करणार्‍या हनुमान केज राठोड (वय २३, रा. साखरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हांगे करत आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!