मोटार वाहन कायद्याचा भंग करणार्‍या दुचाकीचालकांकडून ६३ हजारांचा दंड वसूल


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
अलीकडील गत दिवसात फलटण शहर येथे झालेल्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये दुचाकी वाहनचालक यांचेकडून वाहन चालवताना चुका झाल्याने अपघाताच्या घटना घडल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे मोटर वाहन कायद्यामधील तरतुदींचा भंग करणार्‍या दुचाकी वाहनचालकांवर दि. २७ जून २०२४ रोजी गिरवी नाका येथे १०३ केसेस करून ६३,०००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या कारवाईमध्ये पीएसआय गायकवाड, महिला पोलिस हवालदार फाळके, पोलीस हवालदार फाळके, पोलीस हवालदार सजगने, पोलीस कॉन्स्टेबल धायगुडे, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खराडे यांनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!