सुनील तिवाटणे लिखित ‘छतावरली माणसं’ पुस्तकाचे ३० जूनला प्रकाशन


दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
फलटण येथील श्री. सुनील विजय तिवाटणे लिखित ‘छतावरली माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. ३० जून २०२४ रोजी सकाळी १० ते दु. १ वाजेदरम्यान उपळेकर मंदिर सभागृह, फलटण येथे आयोजित केले आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद, फलटण शाखेचे अध्यक्ष व सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री. रवींद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता असणार आहेत तसेच साद पब्लिकेशन, पुणेचे प्रकाशक श्री. दत्तात्रय दगडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी लेखक, कवी श्री. अनिलकुमार कदम, ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत, अशी माहिती निमंत्रक प्रेरणा विचारमंच गोखळी, अष्टविनायक ग्रुप, जाधववाडी यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!