‘मी चांगला बाप होऊ शकलो नाही!’ पुस्तकाचे आज प्रकाशन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २८ जून २०२४ | फलटण |
दुधेबावी, ता. फलटण येथील अमोल गजानन नाळे अनुवादित, आसामचे मोईना गोस्वामी लिखित, ऑरेंज बुक पब्लिकेशनचे ‘मी चांगला बाप होऊ शकलो नाही!’ या पुस्तकाचे प्रकाशन आज शुक्रवार, दि. २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता भावार्थ, कर्वे रोड, कोथरूड, पुणे येथे आयोजित केला असल्याची माहिती डॉ. चंद्रसुधा गोस्वामी यांनी दिली.

कारागृह पुण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी पुण्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याच्या मुक्त पत्रकार व लेखिका सौ. वसुंधरा काशीकर, फलटणचे प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. किरणकुमार नाळे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button
Don`t copy text!