स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

राज्यात 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू

Team Sthairya by Team Sthairya
May 23, 2020
in Uncategorized

दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री – आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती

स्थैर्य, मुंबई, दि. 22 : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजूरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10 हजार 791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5 हजार 975 अनुज्ञप्ती सुरू सुरू आहेत. आज दिवसभरात 30 हजार 624 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

राज्य शासनाने 3 मे, 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरुन राज्यातील 33 जिल्ह्यात (3 कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. राज्यात दि. 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. आज एका दिवसात अंदाजित 30,624 ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन मद्यसेवन परवाना प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेतांना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असून आता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीद्वारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पद्धतीने सुद्धा उपलब्ध आहेत. सदर मद्यसेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात. तरी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसमोर गर्दी न करता मद्यसेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घ्यावा.

दि.24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल दि.21 मे, 2020 रोजी राज्यात 83 गुन्हे नोंदविण्यात आले असून 38 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 28 लाख 92 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 दि.24 मार्च, 2020 पासून दि.21 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 6,067  गुन्हे नोंदविण्यात आले असून 2,702 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 606 वाहने जप्त करण्यात आली असून 16 कोटी 45 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7  सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक –  १८००८३३३३३३  व्हाट्सॲप क्रमांक – ८४२२००११३३ असून  [email protected] हा ई-मेल आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

कऱ्हाडात भाजपचे महाराष्ट्र बचाव आंदोलन; केला ठाकरे सरकारचा निषेध

Next Post

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

Next Post

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.