
दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२३ | फलटण |मिरगाव, तालुका फलटण हद्दीत वेताळबाबा मंदिराजवळ सुमारे ३० गायींच्या वासरांची छळ व कत्तल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीसह तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या छाप्यात पोलिसांनी ४२ जर्सी गाईंच्या वासरांसह सुमारे ६ लाख १६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शब्बीर शेख (वय ४०, रा. फलटण, तालुका फलटण), सोपान शंकर सूळ (वय ३६, रा. मिरगाव, तालुका फलटण) व एक अनोखी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरगाव (तालुका फलटण) गावच्या हद्दीत वेताळबाबा मंदिराजवळ काल सायंकाळी वरील आरोपींनी सुमारे तीस वासरांची कत्तल केली असून त्यासाठी पिकअप गाडीचा वापर केला असून आरोपी क्रमांक दोन यांनी जनावरांची कत्तल होत आहे हे माहीत असूनदेखील त्यांची जागा भाड्याने दिली म्हणून त्यांचे विरुद्धही कायदेशीर तक्रार दाखल झाली आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपये किमतीची पिकअप गाडी (क्रमांक एमएच०४एल८१५५), ४२ जर्सी गाईंची वासरे वय अंदाजे एक दिवस ते ४० दिवस सुमारे १ लाख २६ हजार रुपये किमतीची, ३० कत्तल केलेली जर्सी गाईंची वासरे अंदाजे किंमत ९० हजार रुपये, असा एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पो.कॉ. सुरेश चौरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे करत आहेत.