शेरेचीवाडी (ढ) नळ पाणी पुरवठा योजनेस 25 लाख निधी मंजूर : सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे


दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । विधान परिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजने अंतर्गत शेरेचीवाडी (ढ) ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती, सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना सरपंच सौ नलवडे म्हणाल्या, ‘‘शेरेचीवाडी (ढ) येथील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे नियमित पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटावा याकरिता सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सदस्य श्रीमंत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे आपण गेली पाच महिने सातत्याने पाठपुरावा केला. म्हणूनच जलजीवन मिशन योजनेतून शेरेचीवाडी (ढ) येथील पाणी पुरवठा योजनेसाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना यश आले आहे. यामुळे शेरेचीवाडी (ढ) गावचा पाणीपुरवठा सुरळीत होणार होवून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे मुबलक पाणी व स्वच्छ पाणी मिळणार आहे.’’

‘‘आगामी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये शेरेचीवाडी (ढ) मध्ये जलसंधारण, आधुनिक शिक्षण, रस्ते, आरोग्य, कृषी, वीज, पाणंद रस्ते, महिला बालकल्याण, घरकुल, समाजकल्याण यासह ग्रामविकासच्या अनुषंगाने सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी काम करतील’’ असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या योजनेच्या मंजुरीसाठी पॅनेल प्रमुख हणमंतराव चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या सौ.राणी महेश चव्हाण, अभिजीत बाळासो मोहिते, सौ.शितल शिवाजी फडतरे, महेश हरिदास बिचुकले,संगिता ज्ञानेश्‍वर चव्हाण व मंगल राजेंद्र पवार तसेच माजी सरपंच श्रीरंग चव्हाण, फलटण तालुका राष्ट्रवादी कार्यकारणी सदस्या उज्वला गुरव, माजी उपसरपंच नथुराम नलवडे, माजी उपसरपंच दिनकर चव्हाण, अरुण चव्हाण, दिपक नलवडे, रविंद्र मोहिते गुरुजी, विश्‍वास शिंदे, संजय ढेंबरे, बाळासो पवार, बाळासो मोहिते ,कोंडिराम चव्हाण, अनिल लोखंडे, जनार्दन कांबळे, दत्तात्रय माने, सचिन शिंदे, भाऊसो सपकळ, संदीप पवार आदिंनी विशेष प्रयत्न घेतले.


Back to top button
Don`t copy text!