कॅन्सरशी लढा देणार्‍या गोखळी येथील चिमुकल्या आदित्यला हवा मदतीचा आधार


दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । गोखळी (ता.फलटण) येथील अवघ्या 13 वर्षाचा आदित्य मुकेश जगताप हा ‘हॉजकिन लिंफोमा’ या अतिशय दुर्धर अशा कॅन्सरच्या आजाराशी लढत असून उपचारासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे.

याबाबत, जगताप कुटूंबियांकडून करण्यात आलेल्या आवाहनानुसार, आदित्यवर पुणे येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून हॉस्पिटलचा मेडिकल व इतर तपासणी खर्च सोडून उपचारासाठी रुपये 4 लाख खर्च सांगण्यात आला आहे. दर पंधरा दिवसातून एकदा किमोथेरपीची ट्रीटमेंट सुरु असून त्यासाठी रुपये 6 हजार 500 इतका खर्च सध्या सुरु आहे. आदित्यचे वडिल मजुरी काम करत असल्याने त्यांना हा आर्थिक खर्चाचा डोंगर पेलणे अशक्य आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याची विनंती जगताप कुटूंबियांच्यावतीने करण्यात आली आहे.

आर्थिक मदत आरटीजीएस / चेक / डीमांड ड्राफ्ट द्वारे देण्यासाठी बँक खात्याचा तपशील याप्रमाणे –
नाव – शिवकन्या मुकेश जगताप
बँक – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा गोखळी
खाते क्रमांक – 1027006005776
आयएफएससी कोड – IBKL485SDC


Back to top button
Don`t copy text!