स्थैर्य,नवी दिल्ली, दि २६: इंडियन कोस्ट गार्डने तमिळनाडुच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका बोटीतून ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला. पाकिस्तानातून आलेल्या श्रीलंकेच्या या बोटीतून 100 किलो हेरोइन आणि सिंथेटिक ड्रग्सचे 20 पॅकेट आढळले. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून 5 पिस्तुल आणि सॅटेलाइट फोन जप्त करण्यात आला आहे.
अधिकृत सूत्रांनी बुधवारी सांगितले की, क्रू मेंबरची चौकशी सुरू आहे. त्यांना ही हिरोइन कराचीतून दिल्याचे त्यांनी कबुल केले आहे. हे ड्रग्स बोटीत रिकाम्या टँकमध्ये लपवण्यात आले होते. बोटीचा मालक श्रीलंकेच्या नेगोम्बोचा रहिवासी आहे.
सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू
इंडियन कोस्ट गॉर्ड 17 नोव्हेंबरपासून समुद्रातून होणाऱ्या तस्करी विरोधात मोठे अभियान चालवत आहे. यादरम्यान गस्त घालणाऱ्या ‘वैभव’ जहाजाने ही मोठी कारवाई केली. कोस्ट गार्डकडून सांगण्यात आले आहे की, सर्व तपास सुरक्षा यंत्रणांकडून अटक केलेल्या सहा जणांची चौकशी सुरू आहे.
एलसीबी’च्या धडाकेबाज छाप्याने ‘सेटलमेंट’ उघडकीस; पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!