पदवीधर निवडणुकीत उदयनराजेंची भुमिका गुलदस्त्यात


 

स्थैर्य,सातारा, दि २६ : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले अद्याप कुठेही प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. भाजपचे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख हे दाेन तीन दिवसांपुर्वी त्यांची भेट घेण्यासाठी साताऱ्यात आले होते. पण उदयनराजेंची आणि देशमुखांची भेट होऊ शकली नाही. दूसरीकडे पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी उदयनराजेंची जलमंदीर पॅलेस या राजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजेंनीही कोकाटे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. उदयनराजे भोसले या निवडणूकीत नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सध्या सातारा जिल्ह्यात पदवीधरच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहे. भाजपसह महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. अशातच महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतूरे रंगले आहेत.

महाबळेश्वरकरांना हवीय पोलिसांची सुरक्षा

या सर्व परिस्थितीत खासदार उदयनराजे भोसले हे मात्र, अद्याप तरी शांतच आहे. सहाजिकच ते भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या पाठीशी असणार आहेत. मंगळवारी पदवीधरचे अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. ही भेट लक्षवेधी ठरली आहे. या भेटीवेळी उदयनराजे यांनी कोकाटे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ऐकूनच या निवडणुकीत उदयनराजेंची काय भूमिका काय राहणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चेला उधाण आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Don`t copy text!