दैनिक स्थैर्य | दि. 02 मे 2024 | फलटण | जगद्गुरु तुकोबाराय निर्याण त्रीशतकोत्तर अमृत महोत्सव व्यसनमुक्त युवक संघाचा रोप्य महोत्सव युवक युवतींसाठी २५ वा प्रतापी संस्कार सोहळा दि. ८ मे ते १५ मे देहू येथे प्रतापी संस्कार सोहळा होणार आहे.
युवक मित्र बंडातात्या कराडकर यांचे वैराग्य मूर्ती तुकाराम महाराज जीवन चरित्रपट दररोज तसेच वाचन सर्व अध्यात्मिक उपक्रम, व्याख्यान, प्रवचन, हरिकीर्तन, विशेष व्यक्ती परिचय, शाहिरी पोवाडे, भारुड, मर्दानी खेळ, गजनूत्य, लेझीम पथक, गुणवंतांचा विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा व इतर नाविन्यपूर्ण उपक्रम होणार असून इंद्रायणी तीरावर गाथा मंदिरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा दैदीप्यमान सोहळा होणार आहे.
तरी या प्रतापी सोहळ्यात जास्तीत जास्त युवक युवतीनी सहभागी होण्याचे आवाहन व्यसनमुक्त संघाने केले आहे.