स्थैर्य, मेढा, दि.२६: कोरोना काळातील वीजबिले कमी करा अथवा माफ करा, या मागणीसाठी “आम्ही जावळीकर’ चळवळीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत वीज बिलांची होळी करण्यात आली.
या प्रसंगी विलासबाबा जवळ म्हणाले, “सामान्य वीज ग्राहक संतापला असून आज बिले जाळली आहेत. पुढील काळात कनेक्शन तोडाल, तर संतापलेला सामान्य माणूस तोडणारालाही सोडणार नाही.” कोरोना काळात मिटर रीडिंग न घेताच ग्राहकांना अंदाजे बिले देवून वाढीव बिले दिली होती. ही बिले न भरता ग्राहक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. पण, ऊर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांचा भ्रमनिरास केला आहे.
ठाकरे सरकारविरोधात साताऱ्यात ‘मनसे’ आक्रमक; ऊर्जामंत्र्यांना ‘झटका’ देणार?
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यात आला. वीजबिले कमी करण्याचे निवेदन नायब तहसीलदार मिलिंद घाटगे यांना देण्यात आले. त्यानंतर वीज बिलांची होळी करण्यात आली. या वेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बजरंग चौधरी, महेश पवार, संतोष कासुर्डे, अरुण जवळ, सुनील धनावडे, विजयमहाराज शेलार, राजेंद्र जाधव, सुभाष मिस्त्री, पांचाली
पवार, कलाबाई पवार, शामल चव्हाण आदी उपस्थित होते.