हयात प्रमाणपत्र ऑनलाईन दाखल करण्याचे आवाहन

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
फलटण तालुकेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ/विधवा/अपंग निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी स्वतः (मोबाईल उपलब्ध असल्यास), इतर कोणत्याही नातेवाईकामार्फत अथवा गावपातळीवरील ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक यांचेमार्फत अथवा सेतू सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नागरी सेवा केंद्र इ. मार्फत, आपले बीएसए या ऑनलाईन प्रणालीव्दारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित लाभार्थी यांनी भविष्यात मासिक लाभाची रक्कम नियमितपणे चालू राहणेकामी, विहीत वेळेत बीएसए या ऑनलाईन प्रणालीव्दारे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने सादर करावे, अन्यथा भविष्यात मासिक लाभापासून वंचित रहावे लागेल, असेही सूचित केले आहे.

Back to top button
Don`t copy text!