फलटणच्या कृषी महाविद्यालयाचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणचा १७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी कृषी महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमास श्री. शरदराव रणवरे, व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, श्री. भोजराज नाईक निंबाळकर, श्री. शिवाजीराव घोरपडे, श्री. आर. एच. पवार, श्री. रणजीत निंबाळकर, श्री. सी. डी. पाटील, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, श्री. रामदास कदम, सदस्य, महाविद्यालयीन समिती, श्री. अरविंद निकम, प्रशासकीय अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी, डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण तसेच डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य, कृषी महाविद्यालय, फलटण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

गेल्या सतरा वर्षांत कृषी महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून राज्यातील कृषी शिक्षण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कृषि महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन संस्था, बँकिंग, कृषी उद्योग तसेच उद्योजक म्हणून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत असल्याचा अभिमान यावेळी व्यक्त करण्यात आला.

कृषी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाबरोबरच प्रयोगशील आणि कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत अनुभवाधारित कृषी कौशल्य विकास कार्यक्रम, ग्रामीण कृषी कार्यानुभव, कृषी उद्योजकता विकास, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, हवामान स्मार्ट शेती, पीक व्यवस्थापन, कृषी पणन, मूल्यवर्धन, कृषी प्रक्रिया, कृषी व्यवसाय व्यवस्थापन तसेच डिजिटल कृषी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली जाते.

कृषी महाविद्यालय हे शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिला बचत गटांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, जनजागृती अभियान, कृषी प्रदर्शन, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रामीण विकास उपक्रम तसेच कृषी विस्तार कार्यक्रम सातत्याने राबवत आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच समाजाभिमुख कार्यातही कृषी महाविद्यालयाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कृषी क्षेत्रातील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आधुनिक विज्ञान, संशोधन आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. शाश्वत शेती, जलसंधारण, हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती आणि कृषी उद्योजकता यांना प्राधान्य देत ग्रामीण विकासात मोलाचे योगदान देणारे सक्षम कृषी पदवीधर घडविण्याची जबाबदारी कृषी महाविद्यालय प्रभावीपणे पार पाडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेत संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन, प्राध्यापकांचे योगदान, प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे कृषि महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केल्याचे सांगितले.

कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच दोन्ही महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषि महाविद्यालयाच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Back to top button
Don`t copy text!