कोळकीची हॉकीपटू ऋतुजा पिसाळ हिची आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला संघात निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
कोळकी (ता. फलटण) येथील हॉकीपटू ऋतुजा पिसाळ हिची आशियाई स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जपानमधील आयची नागोया येथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात २० वी आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने नुकतीच भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली. त्यात ऋतुजाचा समावेश आहे.

ऋतुजा सध्या हॉकीतील देशातील आश्वासक युवा फॉरवर्ड खेळाडू म्हणून ओळखली जाते. याआधीही विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत तिने आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे. ऋतुजाने २०२३ मध्ये महिला ज्युनियर आशिया करंडक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेचे जेतेपद भारतीय संघाने पटकाविले होते.

ऋतुजा ही अगदी सामान्य कुटुंबातून ती पुढे आली आहे. सध्या ती युनियन बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिचे वडील दादासाहेब पिसाळ हे गॅरेजमध्ये मिस्त्रीकाम करतात. आई गृहिणी आहे. आपल्या ड्रिबलिंग कौशल्याने तिने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

Back to top button
Don`t copy text!