खोडशी धरणाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करणार : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२६ | सातारा |
कराड तालुक्यातील खोडशी धरणाचे काम बर्‍याच वर्षांपासून अपूर्ण आहे. हे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणार, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

मंत्री विखे-पाटील यांनी खोडशी धरणाची व कालव्याची पाहणी केली. याप्रसंगी आमदार धैर्यशील कदम, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांच्यासह जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कराड येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार रविवारी खोडशी धरणाला भेट दिली. या धरणाचे काम बर्‍याच वर्षांपासून अपूर्ण आहे. या कामाला निधी उपलब्ध करून दिला जाईल व मार्च २०२७ पर्यंत पूर्ण केले जाईल. या धरणाच्या कालव्यामधून गटाराचे व कचरा मोठ्या प्रमाणात जात आहे. त्यामुळे दूषित पाणी शेतकर्‍यांच्या विहिरी व शेतामध्ये जात आहे. याचा त्रास त्यांना होत आहे. त्यामुळे हा कालवा बंदीस्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले.

यानंतर मंत्री विखे-पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेला भेट देऊन या योजनेची जलसंपदा विभागातील अधिकार्‍यांकडून सविस्तर माहिती घेतली.

Back to top button
Don`t copy text!