माजी खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांतून घाडगेवाडी गावातील पुलाच्या कामास मंजुरी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२६ | फलटण |
घाडगेवाडी गावामधील ‘धरबाचा मळा’ येथील ओढ्यावरील पुलाच्या कामास प्रारंभ झाला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या शिफारशीतून तसेच फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, पंचायत समितीच्या सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले, जिल्हा परिषद सदस्य विष्णूपंत लोखंडे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नांतून हे काम मंजूर झाले आहे.

या पुलाचे काम सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून वरील सर्वांचे आभार मानले आहेत.

यावेळी दशरथ बोबडे, सूर्यकांत बोबडे, संपत भोसले, हनुमंत सापते, रामदास बोबडे, पोपट बोबडे, सुरेश सापते, नितीन बोबडे, योगेश बोबडे, शंभूराज बोबडे उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!