माऊलींच्या पालखी सोहळ्याचा परतीचा मुक्काम १ ऑगस्टला फलटणला

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | फलटण |
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी पालखी सोहळा दि. ०८ जुलै ०९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. श्री माऊलींची पालखी परतीच्या मार्गावर असताना शनिवार, दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी फलटण मुक्कामी येणार आहे, अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त व पालखी सोहळाप्रमुख अ‍ॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली आहे.

याबाबतचे पत्र कमिटीने नामदेव शिंपी समाज विठ्ठल मंदिर फलटण यांना दिले आहे.

पालखी सोहळा मुक्काम असताना करावयाच्या नियोजनात कमिटीने फलटण येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची जागा वारकरी, फडकरी, माऊलीभक्तांना उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. तसेच इतर सेवासुविधा वारकर्‍यांना पुरविण्याबाबत म्हटले आहे.

Back to top button
Don`t copy text!