साखरवाडी येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू

पुरंदर तालुक्यातील दौंडज येथे अपघात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २८ जुलै २०२६ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण) येथील २४ वर्षीय तरुणाचा दौंडज (ता. पुरंदर) कदमवस्ती येथे सोमवारी (दि. २७) सकाळी दुचाकीवर चालवताना अपघात झाला. अपघातानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यश हिम्मत पवार (वय २४, रा. ७ सर्कल होळ, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश हिम्मत पवार याचा सोमवारी (दि. २७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौडज (ता. पुरंदर) येथे अपघात झाला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी सुहास सतीश उंबरे (रा. गोळेगाव, ता. फलटण) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!