
दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२६ | फलटण |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने तहसीलदार, फलटण यांना फलटण तालुक्यातील व शहरातील सीएनजी व एलपीजी पेट्रोलपंपांवर रिक्षांसाठी स्वतंत्र रांग व बारामती रोडवर असलेला एलपीजी पंप सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सुशिक्षित बेरोजगार व सर्वसामान्य युवक कर्ज काढून रिक्षा घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. सध्याचे पेट्रोलचे दर व अॅव्हरेज पाहता पेट्रोल रिक्षाने व्यवसाय करणे परवडत नाही. त्यामुळे सीएनजी व एलपीजी रिक्षांची संख्या वाढली आहे. सद्य:परिस्थितीत फलटण तालुक्यात एकच एलपीजी पंप आहे, तोही बंद अवस्थेत आहे. तसेच सीएनजी पंपांची संख्या अत्यल्प आहे. त्यातच सर्वकाळ सीएनजी पंपावर उपलब्ध होत नाही, ज्यावेळी सीएनजी पंपावर असतो त्यावेळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी रिक्षाचालकांना रिक्षा व्यवसाय बंद ठेवून चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागते. .
यावेळी फलटण शहर तसेच तालुक्यातील रिक्षाचालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.