फलटणच्या नाना पाटील चौकात घाणीचे साम्राज्य; व्यावसायिकांसह नागरिक पडतायत आजारी

ड्रेनेज लाईन दुरुस्तीबाबत श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचे नगरपालिकेला निवेदन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | फलटण |
फलटण शहरातील नाना पाटील चौकात ड्रेनेज लाईन तुंबल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीच्या दुर्गंधीने येथील दुकान व्यावसायिक व नागरिक आजारी पडत आहेत. नगरपालिकेने ही ड्रेनेज लाईन त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टने निवेदनाद्वारे नगरपालिकेकडे केली आहे.

निवेदनात ट्रस्टने म्हटले आहे की, श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचा पुण्यतिथी सोहळा ५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. गेल्या एक महिन्यापासून नाना पाटील चौकात नगरपालिकेची ड्रेनेज लाईन तुंबल्याने येथील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या दुर्गंधीने मंदिरात येणारे भाविक, परिसरातील दुकान व्यावसायिक व नागरिक आजारी पडत आहेत. या ड्रेनेजलाईनची लवकर दुरुस्ती करून भाविकांना दुर्गंधीपासून मुक्त करावे.

Back to top button
Don`t copy text!