
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२६ | फलटण |
ग्रामपंचायत पिंपळवाडी (साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करून ते पूर्ववत करावे, अशी मागणी शरद जाधव (रा. पिंपळवाडी) यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत पिंपळवाडी (साखरवाडी) येथील मी मतदार असून ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचना व आरक्षणातील बदलांविषयी पुढील हरकत नोंदवत आहे.
हरकतीची कारणे :
- वॉर्ड क्रमांक १ मधील एक जागा वॉर्ड क्रमांक २ मध्ये वर्ग करण्यात आली आहे. सदर बदलामध्ये अनुसूचित जाती (डउ) आरक्षणाची जागा पुन्हा वॉर्ड क्रमांक १ मध्ये पूर्ववत करण्यात यावी.
- वॉर्ड क्रमांक ३ मधील एक जागा वॉर्ड क्रमांक ४ मध्ये वर्ग करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने अनुसूचित जाती (डउ) आरक्षणाची जागा पुन्हा वॉर्ड क्रमांक ३ मध्ये देण्यात यावी.
- वरील दोन्ही बाबींवर यापूर्वीच अधिकृत हरकत दाखल करण्यात आलेली आहे. मात्र, त्या हरकतीचा कोणताही विचार झालेला दिसून येत नाही. त्यामुळे सदर हरकतीचा योग्य तो विचार करण्यात यावा.
- सुरुवातीला वॉर्ड क्रमांक ६ मध्ये दोन खुल्या (एक महिला व एक पुरुष) तसेच एक जइउ पुरुष असे आरक्षण होते; परंतु नंतर करण्यात आलेल्या बदलामध्ये वॉर्ड क्रमांक ५ मधील डउ महिला जागा वॉर्ड क्रमांक ६ मध्ये, तसेच वॉर्ड क्रमांक ६ मधील खुली पुरूष जागा वॉर्ड क्रमांक ५ मध्ये वर्ग करण्यात आली आहे. सदर बदलामुळे आरक्षणाची मूळ रचना बदलली असून ती अन्यायकारक आहे.
ही प्रभाग रचना व आरक्षणातील बदल रद्द करून पूर्वीप्रमाणे (मूळ स्थितीत) आरक्षण पूर्ववत करण्यात यावे. तसेच यापूर्वी दाखल केलेल्या हरकतीचा योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा, असे जाधव यांनी म्हटले आहे.
