दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२३ | फलटण |
परदेशात उच्च शिक्षण घेतल्यावर भारतीय तरुणांनी परत आपल्या देशात येऊन आपल्या देशाच्या विकासकार्यात झोकून द्यावे, देशाचा नावलौकिक वाढवावा, असे उद्गार माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजिसिंह नाईक निंबाळकर यांनी काढले.
पुणे विभागीय रेल्वे बोर्ड समिती सदस्य तानाजी करळे यांची कन्या कु. ऋतुजा करळे हिची कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये ‘एमएस’ या उच्च शिक्षणासाठी अमेरिका ‘लास वेगास’ येथील नेवाडा विद्यापीठात निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे अभिनंदन करून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी तिला शुभेच्छा दिल्या.
यावेळी अॅड. नरसिंह निकम, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, फलटण कोरेगाव विधानसभा प्रभारी सचिन कांबळे पाटील, कु. ऐश्वर्याराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक बाळासाहेब भोसले, प्रा. सतीश जंगम, राजेंद्र नागटिळे, रामचंद्र भोसले पाटील, रविंद्र पवार, नितीन वाघ, सूरज तांदळे, संजय पवार, सुभाष इंगळे, सतीश शेडगे, कृष्णा करळे, शंकर करळे व ज्येष्ठ नागरिक संघ मलठण, अचानक मित्र मंडळ मलठण यांच्या सदस्यांनीही ऋतुजा हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.