युवकांनी सायबर क्राईम व पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा अभ्यास करून अधिकारी बनावे – पीएसआय विशाल भंडारे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ मे २०२३ | फलटण |
युवकांनी सायबर क्राईम व पोलीस स्टेशन कामकाजाबाबत अभ्यास करून अधिकारी बनून समाजप्रबोधन करावे, असे प्रतिपादन म्हसवड पोलिस स्टेशनचे पी. एस.आय. विशाल भंडारे यांनी केले.

श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथील टी. वाय. बी. कॉम. चे विद्यार्थी यांनी एम. लॉ चे प्राध्यापक अ‍ॅड. राजू भोसले यांच्या मार्गदर्शनखाली “सायबर क्राइम व पोलिस स्टेशनचे कामकाज” या विषयावर प्रबंध तयार करण्यासाठी “पोलिस स्टेशन विद्यार्थी भेट” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस स्टेशनचे पीएसआय विशाल भंडारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक अ‍ॅड. राजू भोसले, कु. शिवानी कालेकर, कु. विजया बागल, कु. हर्षदा वाघ, कु. साक्षी लोटके, कु. मालती केवटे, यश पिसे, अजित दहीवडे, रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे, वैभव सोनवणे, प्रताप लिंगे हे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पीएसआय विशाल भंडारे म्हणाले, पोलिस स्टेशनच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शन तत्त्वाप्रमाणे आम्ही सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम करतो. महिला व मुलींना अडचणी आल्या तर ११२ क्रमांक वर त्यांनी फोन केल्यास आम्ही तात्काळ त्याठिकाणी जावून त्यांना आम्ही मदत करतो. मुलींनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी आवाहन केले व पोलिस स्टेशनमध्ये चालणार्‍या सर्व कामकाजाची महिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

यावेळी एम. लॉ चे प्राध्यापक अ‍ॅड. राजू भोसले म्हणाले, पीएसआय विशाल भंडारे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांचा आदर्श विद्यार्थी व युवकांनी घ्यावा.

यावेळी पीएसआय विशाल भंडारे यांनी कायद्यावर उत्कृष्ठ मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांना अ‍ॅड. राजू भोसले यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी अ‍ॅड. राजू भोसले, यश पिसे, अजित दहीवडे, रोहन कुंभार, भुवनेश्वर आबदागिरे, वैभव सोनवणे, प्रताप लिंगे, शिवानी कालेकर, विजया बागल, हर्षदा वाघ, साक्षी लोटके, मालती केवटे यांच्यासहीत पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!