अनुबंध कला मंडळामार्फत १५ मे रोजी ‘कामगार सन्मान’ कार्यक्रम; श्रीमंत रामराजेंच्या हस्ते कामगारांचा होणार गौरव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १३ मे २०२३ | फलटण |
अनुबंध कला मंडळ, फलटण यांच्यामार्फत ‘कामगार दिन २०२३’ निमित्त फलटण परिसरात अनेक वर्षे अखंडित सेवा देणार्‍या विविध क्षेत्रातील कामगारांचा सन्मान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. १५ मे २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. प्रसाद जोशी हॉस्पिटल सभागृह, चौथा मजला, लक्ष्मीनगर, फलटण येथे संपन्न होणार आहे.

यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते कामगारांच्या अथक परिश्रमाचा सन्मान करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या सन्मान कार्यक्रमातील सन्मानार्थी कामगार पुढीलप्रमाणे आहेत.

श्री. बाळू नेवसे – ६५ वर्षे शेती कामगार
श्री. महादेव गंगतीरे – ६० वर्षे केशकर्तन
श्रीमती उषा कुलकर्णी – ६० वर्षे नर्स
श्री. हणमंत कुंभार – ५५ वर्षे डंकचालक
श्री. शाकीबभाई मणेर – ५५ वर्षे रिक्षाचालक
श्री. कांतीलाल काकडे – ४५ वर्षे हमाली
श्री. मोतिराम येळेश्वर – ६५ वर्षे विविध कामे
श्री. दत्ता मोहिते – ५५ वर्षे विविध कामे
श्री. दत्तात्रय देशमाने – ४५ वर्षे दुकान नोकर
श्री. दत्तात्रय अहिवळे – ४५ वर्षे चर्मकार

कामगारांच्या या सन्मान कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अनुबंध कला मंडळ, फलटण यांनी केले आहे.


Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!