दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । मुंबई । तरुणांनी निस्वार्थपणे राजकारणात यावे असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी द अनटोल्ड नेताजी या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये सांगितले आहे.
यावेळी द अनटोल्ड नेताजी या यूट्यूब वाहिनीचे संपादक लोकेश चौधरी यांनी तुमच्यासाठी शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न राजकारणात जे तरुण-तरुणी येण्याची इच्छा बाळगतात त्यांनी कोणत्या गोष्टीपासून लांब राहावं आणि मगच राजकारणात यावं असे आमदार निकोले यांना विचारलं असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हे बघा आज आपण कोणत्याही शासकीय कार्यालयात गेलो तिथे आपल्या सर्वांचे महापुरुषांचे प्रतिमा लागलेले आहेत. ज्यांनी समाजासाठी काम केलं. निस्वार्थ हे पाहिलं निश्चित केला पाहिजे. राजकारणात येणाऱ्या तरुणाने कोणताही स्वार्थ मनामध्ये ठेवता कामा नये. स्वार्थ जर घेऊन आलं तर तो राजकारणामध्ये व्यक्तीगत यश प्राप्त करेल. परंतु, तो समाजासाठी काही करू शकणार नाही. देश हितासाठी बाबतीत तो काही करू शकणार नाही. आणि स्वार्थ सांगितला तर पैसे इतर गोष्टी येतात. यापासून तो नक्कीच लांब राहिला पाहिजे. तरच तो समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. ज्या विचारधारेवर मी काम करतो. त्या विचारधारेवर माझं असं मत आहे किंवा ती विचारधारा सांगते आम्हाला की, एखाद्या राज्याच्या म्हणा, गावाचं म्हणा, देशाचं म्हणा, जिल्ह्याचं म्हणा, एखाद्या राज्याचं सरकार किंवा देशाचं सरकार जेव्हा तुमच्या हातात मध्ये किंवा तुम्ही आहात सत्तेवर तर आमचं असं मत आहे की, जेव्हा सत्ता आपल्या हातात मध्ये असते तेव्हा माझं हे कर्तव्य असते देशातील प्रत्येक नागरिक ! एकदम शेवटचा घटक असेल त्याला त्याचे सुखमय जीवन कसं जगता येईल. हे राजकारणात जो येईल त्याने किंवा सत्तेवर बसलेल्यांनी विचार केला पाहिजे. कारण, आपण प्रत्येकाचे मत हे घेतो ना ! तर प्रत्येकाच्या बाबतीत तो विचार केला पाहिजे. आणि माझ्या देशामध्ये भिकारी भिक मागतो याचा अभ्यास मला करावा लागेल. मंदिराच्या समोर पण आज भिकारी दिसतो, रेल्वे स्टेशनवर, बस स्थानकावर तुम्ही बघा सिग्नलवर भिकारी दिसतो भिक मागतो का ? त्याचा अभ्यास करावा लागेल, असे आमदार निकोले म्हणाले.
दरम्यान अँकर कांचन साबळे यांनी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला तर पहिला आणि महत्त्वाचा निर्णय कोणता असेल. यावर आ. निकोले म्हणाले की, ते कसं असतं ती एक पक्षाची ताकत असते मुख्यमंत्री बनणं इतकं सोप्प असतं का ? ठीक आहे असतो तर माझी जी विचारधारा आहे किंवा समाजासाठी मला जे योग्य वाटतं. आज बेरोजगारी खूप वाढलेली आहे, शिक्षणाचे खाजगीकरण आहे, शिक्षण महाग झालेलं आहे. लोकांना रेशन मिळत नाही, पाणी मिळत नाही हे सर्व प्रश्न आहेत ते मी पहिले सोडून टाकले असते. दनादन निर्णय घेऊन टाकले असते, पहिले हे सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी सांगितले.