शासकीय योजना न पोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री शंभुराज देसाई


दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । सातारा । शासकीय योजना न पोहोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या.

शासकीय योजनांची जत्रा व नियोजित मुख्यमंत्री महोदयांचा दौरा याबाबत पालकमंत्री श्री. देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, मरळी ता. पाटण येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत १३ मे रोजी दौलतनगर-मरळी येथे ‘शासकीय योजनांची जत्रा’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे २५ हजार पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने योग्य नियोजन व्हावे, यासाठी पालकमंत्री श्री. देसाई यांनी आवश्यक त्या सूचना बैठकीत दिल्या.


Back to top button
Don`t copy text!