व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र अंतर्गत युवती व महिला आघाडी संस्कार शिबीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २५ मे २०२३ । फलटण । व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र अंतर्गत महिला आघाडीच्यावतीने  शुक्रवार दि. २६ ते रविवार दि. २८ मे दरम्यान राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत गुरुकुल, पिंप्रद, ता. फलटण येथे युवती व महिलांसाठी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये मोठ्या संख्येने युवती व महिलांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य सचिव योगेश जाधव यांनी केले आहे.

युवक मित्र ह.भ.प. बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेरणेने आयोजित या संस्कार शिबीरात योगा, प्राणायाम, ध्यान, नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, व्याख्यान आणि विविध खेळ यांच्या माध्यमातून देव, देश आणि धर्म कार्य करण्यासाठी हा ३ दिवसीय युवती व महिला संस्कार सोहोळा आयोजित करण्यात येत असल्याचे महिला आघाडी अध्यक्षा ह.भ.प. सौ. मीराताई हेमंत रणवरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

शुक्रवार दि. २६ मे रोजी सकाळी ७ वाजता या संस्कार शिबीराचे उद्घाटन गॅलेक्सी  को – ऑप. क्रेडिट सोसायटी सोसायटी फलटणच्या संचालिका सौ. सुजाता सचिन यादव आणि राष्ट्रबंधू राजीव दीक्षीत गुरुकुल पिंप्रदच्या मुख्याध्यापिका सुषमा शिवाजी दशरथे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात येणार आहे.

या सोहोल्यात रविवार दि. २८ मे रोजी दुपारी २.३० वाजता निराधारांचा आधार, जालीहाळ बु|| जत येथील वैशालीताई लाड यांना पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई नडे यांच्या हस्ते झाशीची राणी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या संस्कार शिबीरात दररोज पहाटे ५.१५ वाजता योगा, प्राणायाम, ध्यान, ६.३० वाजता प्रार्थना, सुलभ नित्योपासना, वाचन, सकाळी ८ वाजता अल्पोपहार, सकाळी ९ वाजता विविध गुणदर्शन, सकाळी १० वाजता कामाचे वर्गीकरण (मिटिंग), सकाळी १०.३० व्याख्यान, दुपारी १२ वाजता भोजन विश्रांती, भजन, दुपारी २ विविध कार्यक्रम, गुणगौरव सोहोळा, दुपारी ३ वाजता चर्चा सत्र, सायंकाळी ४.१५ वाजता व्याख्यान, सायंकाळी ५.३० वाजता हरिपाठ, फुगड्या, संगीत खुर्ची, रात्री ७ ते ९ कीर्तन, भारुड, रात्री ९ वाजता भोजन, रात्री १० वाजता मेहंदी व रांगोळी स्पर्धा. रात्री ११ ते ४ विश्रांती. असा ३ दिवसीय संस्कार शिबीर कार्यक्रम आहे.

राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत गुरुकुल ही संस्था आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर पिंप्रद, ता. फलटण गावच्या हद्दीत आहे. तेथे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र चे मुख्य कार्यालय आहे. गुरुकुल येथे येण्यासाठी पालखी मार्गावर पंढरपूर – पुणे मार्गावरील एस. टी. बस सुविधा उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!