![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2022/01/YC4.jpg?resize=734%2C356&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि.२९ जानेवारी २०२२ । सातारा । ऑनलाईन परीक्षेचा निर्णय अचानक फिरवून ऑफलाईन परिक्षेचा निर्णय वायसी कॉलेज व्यवस्थापनाने घेतल्याने शुक्रवारी एकच गोंधळ झाला . ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना अद्याप एसटी बस नसल्याने त्यांचे नुकसान होईल परिक्षा ऑनलाईन व्हाव्यात या मागणीसाठी विद्याथ्र्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वार परिसरात धरणे आंदोलन केले .
ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्याने शुक्रवारी एकच गोंधळ झाला .अचानकपणे निर्णय बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईनच घ्यावी, अशी मागणी करत साताऱ्यातील सायन्स कॉलेजच्या परिसरात धरणे आंदोलन सुरु केले. सध्याची करोना स्थिती पाहता शिवाजी विद्यापीठाने एस. वाय., टी. वाय. मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा जाहीर केलेली असताना अचानकपणे विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
एकीकडे ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर आता परीक्षाही ऑनलाईनच होतील असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले होते. तसेच गेल्या काही महिन्यांपासून एस. टी. संप सुरु असल्याने सातारा शहरात महाविद्यालयात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची ससेहोलपट सुरु आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आता परीक्षा ऑनलाईनच होतील व तसे जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने जो अभ्यास झाला त्यावर विसबूंन परीक्षेची वाट पहात होते.
मात्र, शिवाजी विद्यापीठाने एस. वाय व टी. वाय. च्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन होतील, असे जाहीर केलेले असताना अचानकपणे ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला. सायन्स कॉलेजच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना परीक्षा ऑफलाईन होतील, असे सांगितले. मात्र, अचानकपणे हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी नाराज झालेले आहेत. सध्या एस. टी.संप सुरु असल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षेसाठी येताना वाहन व्यवस्था नाही. तसेच रिक्षा, इतर खासगी वाहनातून येताना प्रवास खर्चही मोठा होतो. ऑफलाईन परीक्षा पाच वाजता संपल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी एस. टी. सेवा नाही. मग रिक्षा वा खासगी सेवेचा वापर करताना विद्यार्थ्यांना घरी . पोहोचण्यास उशिर होणार आहे. मग अभ्यास व तयारीसाठी वेळ अपुरा पडणार आहे.विद्यार्थी आणि कॉलेज व्यवस्थापनं यांच्यात अद्यापही कोणतीही चर्चा न झाल्याचे सांगण्यात आले.