महिलांनी सावित्रीच्या शिक्षणाचा वसा पुढे चालू ठेवावा : अँड मोहिनी भागवत


दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२३ । बारामती । महिलांनी आर्थिक सक्षम बनत असताना शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता मुलगी, सून यांना उच्च शिक्षण द्यावे व माता सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा पुढे चालू ठेवावा असे प्रतिपादन दौंड तालुक्यातील मळद गावच्या विद्यमान सरपंच सौ. अँड. मोहिनी बापुराव भागवत ( शेलार ) यांनी केले. कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाऊंडेशनचे फिनिक्स इंग्लिश मेडियम स्कुल कनेक्ट पोदार जंबो किडस् ,सुर्यनगरी ,बारामती येथे मकर संक्रांती निमित्त महिला पालक मेळावा व मळद च्या सरपंच सौ. अँड. मोहिनी बापुराव भागवत ( शेलार ) यांची
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी सौ भागवत बोलत होत्या.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम पवार,डॉ स्नेहल पवार,अल्पाताई भंडारी,वंदना देवकाते,नीता सुतार, साधना बोराटे ,सारिका ओगले , सौ ओमी पिरजादे ,सुजाता पाटील , अश्विनी शिंदे, श्रद्धा माने आदी मान्यवर महिला उपस्तीत होत्या.

सासू सासरे व पती यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी सरपंच व न्यायाधीश होऊ शकले त्याचप्रमाणे महिलांनी चूल व मूल च्या पलीकडे शिक्षण घेऊन जात असल्याने शिक्षण घ्या व शिक्षणाचा प्रचार प्रसार करा असेही सौ भागवत यांनी सांगितले . महिलांच्या व मुलीच्या शिक्षणासाठी सहकार्य करून आर्थिकसक्षम साठी बचत गटाच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने सहकार्य व मार्गदर्शन करण्याची ग्वाही संस्थापक अध्यक्ष तुकाराम पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठान फुड टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख प्रा. सुजाता वैभव पाटील यांना
‘महिला सक्ष्मीकरण व अन्नप्रक्रिया व्यवसायातील संधी ‘ या विषयासाठी युवा फाऊंडेशनतर्फे राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व युवराज देवकाते यांची चंद्रपूर सैनिक स्कुल येथे निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वंदना देवकाते यांनी केले तर आभार डॉ स्नेहल पवार यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!