‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि. 25 जानेवारी 2023 रोजी  सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

राष्ट्रीय मतदार दिन देशभरात दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्रात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम कोणते आहेत, राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश, मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा याबाबतची  सविस्तर माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती वर्षा आंधळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!