सातारा उपनगरात महिलेचा विनयभंग


दैनिक स्थैर्य । दि. २६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहरातलगत असलेल्या एका उपनगरात महिलेला भररस्त्यावर आडवून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आदित्य सपकाळ (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित महिला ही ती राहत असलेल्या उपनगरातील एका पीठाच्या गिरणीत दळण ठेवण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला यानंतर घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकार आईला सांगितल्यानंतर संशयिताला जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या आईला व तीला शिवीगाळ,दमदाटी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे या करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!