स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार ?; राज्यात जोरदार हालचाली सुरु


दैनिक स्थैर्य | 18 मे 2025 | मुंबई | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या दोन टप्प्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तातडीने घेण्याच्याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा पावले उचलली आहेत. त्यानुसार राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत.

आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग पावले उचलत आहे. यामध्ये सूत्रांच्या माहितीनुसार राज्यामध्ये पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होणार आहेत तर दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न होणार आहेत.

नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ह्या जुन्या प्रभाग पद्धतीने होणार कि नव्याने पुन्हा प्रभाग रचना होणार आहे; याचे उत्तर सुद्धा गुलदस्त्यात आहे; यावर सुद्धा लवकरच माहिती समोर येणार आहे.

याबाबत अद्याप अधिकृत माहिती आली नसली तरी येणाऱ्या काही दिवसात निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!