पश्चिम महाराष्ट्रामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीस सर्वतोपरी सहकार्य करणार : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2021 | फलटण | भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून वुमन एम्पॉवरमेंट (महिला सक्षमीकरण) या धोरणानुसार देशातील महिलांनी स्वतः व्यवसायामध्ये पुढे येऊन आर्थिक उन्नती झाली पाहिजे व आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले पाहिजे या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. याचाच एक भाग म्हणून विविध कार्पोरेट कंपन्या मध्ये महिला सबलीकरण होण्याच्या दृष्टीने काम सुरू झालेले आहे. पुणे येथे महिलांनी चालवलेले हे विभागीय कार्यालय करण्यात आलेले आहे. या कार्यालयामधून तब्ब्ल 111 कोटींचा व्यवसाय झालेला आहे. महिलांनी केलेले उत्कृष्ट काम आहे. सदर महिला कर्मचाऱ्यांचे कामकाज कौतुकास पात्र असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द सार्थकी लावलेला आहे. आगामी काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या या कार्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व व्यक्तिशः मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले.

पुणे येथे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या महिला विभागीय कार्यालयाचे उद्घाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विभागीय कंपनीचे रुद्रेश रॉय डीजे एम, आर श्रीनिवासन आर एम, बी बी पोंदे सीनियर डीएम, वनिता कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!