![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2021/09/Vanchit-Bahujan-Aghadi.jpg?resize=489%2C237&ssl=1)
दैनिक स्थैर्य । दि. 12 ऑक्टोबर 2021 । फलटण । मौजे खामगाम (ता.फलटण) येथील अल्पवयीन मुलीस जातीवाचक शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देणार्या आरोपींना अटक करुन पिडीतेस न्यावा द्यावा; अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात देण्यात आले असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, सागर रणवरे, राहुल कांबळे, विजय कांबळे, चित्राताई गायकवाड, सपनाताई भोसले, मयुरी गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित घटनेची फिर्याद पिडीत मुलीने पोलीस ठाण्यात देऊनही अद्याप आरोपींवर कोणतीच कारवाई झालेली नाही. सदरचे आरोपी मोकाट फिरत असून त्यामुळे पिडीतेच्या व तिच्या कुटूंबियांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आरोपींना ताबडतोब अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.