निरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात कधीही पाणी सोडणार


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । फलटण । निरा देवघर धरण पाणलोट श्रेत्रात पावसाचा जोर भरपुर असल्याने पाणी पातळी 659.40 मीटर /8280 दलघफू /69% इतकी झाली आहे. तरी मागील 12 तासात 2422 द. ल. घ. फु इतका पाणीसाठा आलेला आहे. म्हणजे सरासरी ५६०४५ क्युसेकने विसर्ग येत असल्याने उद्या सकाळ पर्यंत पाणीसाठ्यात वाढ जास्त प्रमाणात होत असल्याने नदीपात्रात पाणी केंव्हाही सोडले जाऊ शकते तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा निरा पाटबंधारे उपविभागाच्या मार्फत देण्यात आलेला आहे.

निरा देवघर धरणातून पाणी वीर धरणात येते. वीर धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीर धरणातून पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडले जाईल. खंडाळा, फलटण, माळशिरस, बारामती, पंढरपूर, तालुक्यातील नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!