दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द वॉक फॉर ह्युमॅनिटी’ हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम मुंबई येथे संपन्न झाला.
अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या महिला, दिव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्या व्यवसायातील महिला सहभागी झाल्या.
यावेळी ट्रस्टच्या विश्वस्त निदर्शना गोवाणी, रमेश गोवाणी, मंजू लोढा, शायना एन.सी. प्रामुख्याने उपस्थित होत्या.